संस्कृतमध्ये लड्‌डुः आणि लड्‌डुकः असे दोन्ही शब्द आहेत असे संस्कृत कोश म्हणतो.  हा शब्द अग्निपुराणात आलेला आहे, असेही दिले आहे. यावरून लड्‌डूचे लाडवांना का होते ते समजले. बंडू, चेंडू, खडू, दगडू हे शब्द तद्भव नसल्याने (कंदुकवरून चेंडू झाला असेल, पण फार बदल होऊन) बंडवाने इ. होत नाही आणि लाडूचे लाडवाने होते.  एकूण काय 'भुभवाने/भुभवांनी'  होणार नाही असे दिसते आहे. बहुधा म्हणूनच सासू, आंसू ह्या संस्कृतोद्भव शब्दांची रूपे सासवांनी, आसवांनी अशी होतात.