अचि श्‍नु-धातु-भ्‍रुवाम्‌ य्वोरियङुवङौ(इ+उ+ओ:+इयङ्‌+उवङौ)(पाणिनी ६.४.७७) या सूत्रानुसार नु प्रत्यय लागणार्‍या स्वरान्त धातूंची व भ्‍रूसारख्या नामांची आणि अन्य इ-उकारान्त धातूंची रूपे होताना इ-ई आणि उ-ऊ चे अनुक्रमे अय्‌ आणि अव्‌ होतात.

उदाहरणार्थ, भ्‍रू ची भ्‍रुवौ, भ्‍रुव:, भ्‍रुवा, भ्‍रुवे, भ्‍रुवै, भ्‍रुवि, भ्‍रुवाम्‌ अशी रूपे होतात.  नु प्रत्यय लागणार्‍या सु धातूची रूपे "सुनोमि सुनुव:/सुन्व: सुनुम:/सुन्म:" अशी होतात.