रेल्वे स्टेशनवर उद्‌घोषणा साधारणपणे अशीच ऐकू येते--अमुक गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक दोन... वर्येत आहे. तसेच आकाशवाणीवर बोलणारे वक्ते वाक्यांत कुठेही यती घेतात.  त्यामुळे अर्थाची हानी होते हे त्यांना का समजू नये? मराठीतल्या नव्व्याण्णव टक्के जाहिरातीतले आणि भित्तिफलकावरचे मराठी चुकीचे असते. गतिमार्गावर पाटी येते-"बोगदा पुढे आहे". अर्थ असा की, अजून काही बोगदा येत नाहीये, काळजी करू नका. भरधाव गाडी चालवा!