हिच गोष्ट ATM च्या बाबतीत लक्षात ठेवावी. इथे नेहमी मराठी चा पर्याय वापरावा. कारण काही वर्षांनी जर बँकेने पाहणी केली आणि त्यांच्या असे लक्षात आले की मराठी चा पर्याय जास्त वापरला जात नाही तर ते नवीन येण्याऱ्या यंत्रातून हा पर्याय काढून टाकतील. जर आपण विचारणा केली तर ते पाहणी चा डेटा दाखवतील . कोणता पर्याय किती वेळा वापरला हे यंत्रात सहज साठवले जाऊ शकते.

हे लिहण्या मागचा उद्देश म्हणजे , मी बऱ्याच मराठी  माणसांना ह्याबद्दल विचारले असता असे लक्षात आले होते की , ते इंग्रजी चा पर्याय वापरतात.