आपल्या विचारांशी सहमत. मराठीचा आग्रह धरलाच पाहिजे.

भाषा वापरली की टिकते हे आपण जाणताच. तरी ही सूचना मनावर घ्यावी ही विनंती.

नक्कीच.

माधवराव, आपण दिलेले उदाहरण काहीसे पटते पण पूर्ण नाही. माझ्या ह्या मतामागे मला एवढे विचारावे लागेल की रिलायंस चा तो दुरध्वनी क्रमांक त्यांच्या बोरिवली कार्यालयाचाच होता की त्यांचा मुंबईतील एक केंद्रित क्रमांक होता? कारण बहुतेक कंपन्यांचे कॉल सेंटर किंवा ग्राहक सेवेचे क्रमांक पूर्ण शहराकरीता एकच असला तरी त्यांचे कामकाज तिथेच चालत नाही. त्यामुळे आपण लावलेला फोन हा मुंबईबाहेर जोडला गेला असेल तर त्या माणसाला मराठी येतच असेल हे नाही म्हणू शकत. उदा. मी मागील महिन्यात आयसीआयसीआय बँकेच्या मुंबईतील ग्राहक सेवेला फोन लावला. तेव्हा आमचे संभाषण ईंग्रजीतून होत होते पण मला त्या माणसाचा दक्षिण भारतीय प्रभाव नीट कळत होता. आणि मग त्याला ठाणे/मुंबईतील विभाग माहित नसल्याने मी त्याला सहज विचारले तर त्याने सांगितले की तो हैदराबाद मधून बोलत आहे.

ह्यामुळे जर मराठी पर्याय नसेल आणि आपण दुसरा पर्याय निवडून मराठीत बोलणे सध्या तरी नेहमीच फायद्याचे ठरणार नाही. ह्याकरीता हेच करावे लागेल की आपण सर्वांनी त्यांना सांगितले पाहिजे की आम्हाला मराठी भाषेतून कार्यपद्धती पाहिजे.

माझ्या आईचा व मायबोलीचा मान सन्मान मीच ठेवला नाही तर इतर भाषिक का ठेवतील ?
मान्य. सहमत.