"व्हाईट कॉलर्ड (पांढरपेशा) वर्गाला त्यांच्या कमरेखालच्या विनोदांनी त्यांच्या सिनेमांपासून दूरच ठेवले. पण पिटातल्या प्रेक्षकांनी त्यांना जे डोक्यावर उचलून घेतले त्यानेच त्यांची कारकीर्द यशस्वी करवली. "

माझ्या मते हा वर्षानुवर्षे चालत आलेला पूर्वग्रह आहे.

दादांच्या सिनेमात येण्याआधीच्या कारकिर्दीत त्यांनी 'विच्छा'चे अनेक प्रयोग केले होते. जनमानसाची त्यांना उत्तम जाण होती. केवळ काही समीक्षकांच्या पूर्वग्रहामुळे  तथाकथित पांढरपेशा वर्ग त्यांच्या सिनेमांपासून दूर राहिला.

गंमत म्हणजे आज हाच पांढरपेशा वर्ग 'लाफ्टर चॅलेंज' सारख्या कार्यक्रमात अतिशय थिल्लर व अश्लील विनोद सहकुटुंब-सहपरिवार बघताना आढळतो.  

असो,

माधवजी, ह्या उत्तम लेखाबद्दल आपले अभिनंदन !