पद्यानुवादाचे इतके पैलू उलगडून दाखवल्याबद्दल सर्वप्रथम तुमचे आभार. तुम्ही म्हटल्याप्रमाणे पद्यानुवादात कशाकशाचा आस्वाद घ्यायचा याची सामान्य वाचकास पुरेशी जाण नसते. या लेखामुळे आता पद्यानुवादाचा आनंद आमच्यासारख्या वाचकांना अधिक चांगल्या प्रकारे घेण्यास मदत होईल.

ज्यांना ते आवडत नाहीत ते मात्र पद्यानुवाद होणे थांबेल कसे ह्याबाबत अत्यंत आग्रही दिसून येतात

खेदाची बाब आहे, पण तुमचा हा लेख वाचून त्यांचा दृष्टीकोन बदलेल याची मला खात्री वाटते.

एक विनंती, उत्तर जाहीर करताना (जर आधीच कुणी प्रतिसादात लिहिले नसतील तर) मूळ गीताचे शब्द (किमान दुवा तरी) द्यावा.

( हा लेख मनोगताच्या मुखपृष्ठावर का बरे दिसत नाही ? )