ह्याशिवाय तिथे बिल करायलाही बरीच मोठी रांग असते. त्यामुळे ४/५ च वस्तू घेतल्या तर बिल करण्यात च जास्ती वेळ जातो. त्यापेक्षा  साध्या दुकानात ही कमी वेळ लागेल. शिवाय आपण बिलिंग काउंटर वर काही चौकशी केली असता कोणी काही नीट माहिती पण देत नाही. इकडे विचारा, तिकडे विचारा असे करतात. आणि दुकानातल्यासारख्या कुठलीही वस्तू मिळेल च असेही नसते. एकंदर काय तर मॉल्स मध्ये डोळस पणानेच खरेदी केलेली बरी.