चिंतामण द्वारकानाथ (सीडी) देशमुख आणि कुसुमाग्रजांनी केलेले अनुवाद दिल्याबद्दल धन्यवाद.

विविध साहित्यकृतींचे भाषांतर आणि अनुवाद केल्यामुळे प्रामुख्याने दोन गोष्टी साध्य होतात असे मला वाटते.
१. इतर भाषांतले साहित्य आपल्या भाषेत अनुवादित झाल्यावर वाचकांच्या जाणिवा अधिक समृद्ध आणि विस्तृत होण्यास मदत होऊ शकते.
२. भाषांतरांमुळे आपल्या भाषेत लिहिण्याची, बोलण्याची गोडी लागण्यास हातभार लागू शकतो.

बहुतेक वेळा मूळ भाषेतल्या साहित्याचा आशय आणि अभिव्यक्ती ह्या दोन्ही गोष्टी भाषांतराच्या, अनुवादाच्या पल्याड असतात. विशेषतः कवितेच्या बाबतीत. त्यामुळे अनेकदा भाषांतर/अनुवाद फसला तर कधी फारच सपक व हास्यास्पद होतो तर कधी अतिशय उथळ आणि बटबटीत. असे असले तरी गोळेकाका आणि त्यांचे समानधर्मी हुरूप तसूभरही कमी होऊ न देता, सातत्याने आणि निगुतीने भाषांतराचे, अनुवादाचे काम अतिशय आवडीने करत असतात. आणि ह्या त्यांच्या कार्यामुळे नमूद केलेले २ र्‍या क्रमांकाचे कार्यास हसत-खेळत हातभार लागत असावा असे वाटते. त्यांच्या ह्या कार्यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा.