चक्रधर, ताबडतोब, उत्स्फूर्त प्रतिसादाची चव पहिल्या प्रेमासारखीच असते! तेव्हा त्याखातर मनःपूर्वक धन्यवाद.

अनुवादाचे कूट उकलतांना मूळ गीताचे शब्द उपलब्ध करून द्यावेत ह्या विचाराशी मी १००% सहमत आहे.
किमान दुवा देण्याचा प्रयत्न अवश्य करेन.

खरे तर सारणित एका स्तंभात मूळ तर दुसऱ्यात अनुवाद अशाप्रकारे प्रत्येक कडवे स्वतंत्र ओळीत लिहून वाचणे श्रेयस्कर.
तशी काही तरी सोय असायला हवी.

प्रशासक महोदय, उत्तरासोबत मूळ गीताचे सर्व शब्द देण्याची प्रथा ठेवावी, व एक दिवसानंतर ते उतरात्मक मूळ गीत नष्ट करावे, असे केल्यास मूळ गीताचा शोध लोकांना अनुवादाप्रत घेऊन येऊ शकणार नाही आणि कंप्रतापट्टीच्या अरुंदतेचा (बँडविड्थ) प्रश्न उद्भवणार नाही. अशी सूचना कराविशी वाटते. मात्र आस्वादाच्या दृष्टीने चक्रधरांची सूचना अतिशय योग्य आहे, तेव्हा ती वर सकारात्मक विचार अवश्य व्हावा ही नम्र विनंती.