चित्त, सद्यःपरिस्थितीबद्दल तुम्ही दिलेल्या मुद्द्यांपैकी पहिली तीन कारणे माझ्यामते लागू पडतात.
असो. या अभिनव कामगिरीसाठी अभिनव बिंद्राचे अभिनंदन आणि शुभेच्छा!
सकाळी १० वाजता थेट प्रक्षेपण पाहिल्यावर, केवळ ही आनंददायक बातमी इतरांना लवकर कळावी म्हणून मी वरील प्रतिसाद, चर्चा प्रस्तावाच्या रुपात सकाळी दहा-सव्वादहाला सुपुर्द केला, तेव्हा तो इतक्या कूर्मगतीने दुपारनंतर प्रसिद्ध होईल याची मला बिलकूल कल्पना नव्हती. (आतापर्यंतचा माझा पहिलाच चर्चाप्रस्ताव होता) मात्र काही का होईना, तो प्रसिद्ध झाला हे महत्त्वाचे! त्याबद्दल आभार मानू इच्छितो. शिवाय मूळ चर्चाप्रस्ताव स्वतंत्र न देता चित्त यांच्या लेखाला आलेला एक प्रतिसाद म्हणून दाखवून, प्रशासकांनी बिंद्राप्रमाणेच उत्तम कामगिरी केली आहे. त्याबद्दल देखील आभार मानू इच्छितो. संकेतस्थळाला हातभार लावणारी (?) अशीच प्रशासकीय धोरणे सर्व सदस्यांना अपेक्षित आहेत काय? त्यांनी आपली मते मांडली तर बरे होईल.
-सौरभ