टवाळा आवडे विनोद, या उक्तीनुसारच हा विनोद समजायला हवा.
ज्ञानेश्वर, विनोबा, देशमुख, कुसुमाग्रज यांचे काळी मूळ काव्याप्रती विद्यमान असणारा आदरभाव आज आपल्यांत नाही.
मूळ काव्यातल्या आशयाचे संपूर्ण गांभीर्याने अनुवादात अवतरण व्हावे ह्याकरता ते जे सायास करत त्याच्या पासंगालाही आपले प्रयत्न पुरणार नाहीत. तेव्हा तुलना करणे हा माझा उद्देश नव्हताच.
मी ज्याप्रकारच्या वर्गीकरणाकरता त्यांच्या अनुवादांचा उल्लेख केलेला आहे त्यासंदर्भातही त्यांचेप्रतीचा माझा आदरभाव मुळीच कमी नाही.
मुळात टिंगल-टवाळीसाठी अनुवाद करता करता चुकीने/निरुपायाने तो गंभीर वठला असेही प्रकरण त्यांपैकी कुणाचेही नाही. माझेही तसे नसावे याकरता मी प्रयत्नशील असतो. आपल्याला हवी तीच अभिव्यक्ती समर्थपणे साध्य होणे हेच सशक्त अनुवादाचे यश असते.
मात्र, आपले भिन्नवृत्ती अनुवाद एवढे सुंदर वठले आहेत की त्यांचे नाव घ्यावेच लागले.
शिवाय, मनोगतावर पद्यानुवादांच्या लोकप्रियतेखातर तुम्ही जो सक्रिय पुढाकार घेऊन "कूटप्रश्न अनुवाद" हा प्रकार नावा-रूपास आणलात त्याखातर मनोगत आपले ऋणी राहील. महाजालीय पद्यानुवादांचा इतिहास आपले नाव घेईल.