देशमुख आणि कुसुमाग्रजांचे अनुवाद तुम्ही वाचलेच असावेत. नसल्यास अवश्य वाचावेत.

विविध साहित्यकृतींचे भाषांतर आणि अनुवाद केल्यामुळे प्रामुख्याने दोन गोष्टी साध्य होतात असे मला वाटते.
१. इतर भाषांतले साहित्य आपल्या भाषेत अनुवादित झाल्यावर वाचकांच्या जाणिवा अधिक समृद्ध आणि विस्तृत होण्यास मदत होऊ शकते.
२. भाषांतरांमुळे आपल्या भाषेत लिहिण्याची, बोलण्याची गोडी लागण्यास हातभार लागू शकतो.

बहुतेक वेळा मूळ भाषेतल्या साहित्याचा आशय आणि अभिव्यक्ती ह्या दोन्ही गोष्टी भाषांतराच्या, अनुवादाच्या पल्याड असतात. विशेषतः कवितेच्या बाबतीत. त्यामुळे अनेकदा भाषांतर/अनुवाद फसला तर कधी फारच सपक व हास्यास्पद होतो तर कधी अतिशय उथळ आणि बटबटीत. असे असले तरी गोळेकाका आणि त्यांचे समानधर्मी हुरूप तसूभरही कमी होऊ न देता, सातत्याने आणि निगुतीने भाषांतराचे, अनुवादाचे काम अतिशय आवडीने करत असतात. आणि ह्या त्यांच्या कार्यामुळे नमूद केलेले २ ऱ्या क्रमांकाचे कार्यास हसत-खेळत हातभार लागत असावा असे वाटते. त्यांच्या ह्या कार्यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा.

आपण उत्स्फूर्ततेने दिलेला वरील अभिप्राय पद्यानुवादांच्या कर्त्यांस प्रत्साहनच ठरेल ह्यात संशय नाही.
त्याद्वारे आपल्या विचारांतील पद्यानुवादांप्रतीची निखळ सकारात्मक बाजू समोर आली आहे.

अनुवाद उथळ, बटबटीत, सपक वा हास्यास्पद होऊ शकतो.
त्यापाठचे प्रयत्न तसे नसतात.
अनुवादकही तसे नसतात.

ते तुम्हाला काय द्यायचा प्रयत्न करत आहेत हे समजून घ्या. आणि न मिळाल्यासही काय मोठेसे बिघडणार आहे?
मात्र मिळालाच तर तुम्ही म्हणता तसा फायदा मिळू शकेल. तेव्हा पद्यानुवादांचे स्वागत करा.