मूळ चर्चाप्रस्ताव स्वतंत्र न देता चित्त यांच्या लेखाला आलेला एक प्रतिसाद म्हणून दाखवून, प्रशासकांनी बिंद्राप्रमाणेच उत्तम कामगिरी केली आहे.  त्याबद्दल देखील आभार मानू इच्छितो.   संकेतस्थळाला हातभार लावणारी (? ) अशीच प्रशासकीय धोरणे सर्व सदस्यांना अपेक्षित आहेत काय?

मला वाटतं, चित्त यांचा चर्चाप्रस्ताव जास्त व्यापक आहे... नुसता अभिनंदनाचाच नाही. (म्हणजे अभिनंदन तर आहेच, त्याशिवाय ह्याविषयीच्या इतर अनेक पैलूंवर (उदा. चांगली कामगिरी न होण्याची कारणे/सबबी) चर्चा अपेक्षित आहे. बहुतेक म्हणूनच आपला चर्चाप्रस्ताव वेगळा न ठेवता दुसऱ्या चर्चाप्रस्तावाच्या प्रतिसादाच्या स्वरूपात प्रकाशित झाला असावा. (मला वाटतं की हे ह्यापूर्वी अनेकदा झालेलं आहे. आणि त्याबद्दल कोणा प्रस्तावकाने कोणत्याही स्वरूपात (म्हणजे, औपरोधिकदेखील) तक्रार केल्याचे माझ्या स्मरणात नाही. जात्याच असलेले तारतम्य वापरून प्रशासक अनेकदा असे निर्णय घेतात आणि अशा कृती (कृतीचं अनेकवचन कृत्या होतं काय?) करतात. मला तरी हे प्रशासकीय धोरण एकूणच व्यवस्थापनाच्या दृष्टीने अतिशय योग्य वाटतं.)

तेव्हा तो इतक्या कूर्मगतीने दुपारनंतर प्रसिद्ध होईल याची मला बिलकूल कल्पना नव्हती.

मला वाटतं, चर्चाप्रस्ताव पाठवताना त्याची छाननी होऊन मगच प्रसिद्ध होईल अशी (किंवा अशा आशयाची) सूचना लेखकाला दिली जाते. चू.भू.द्या.घ्या. हे धोरणदेखील अयोग्य वाटत नाही.