चैत रे चैत, अहो पण सकाळी १० वाजता पाठवलेली एखादी उत्स्फूर्त बातमी दुपारनंतर प्रसिद्ध झाली तर तिचा काय उपयोग? आणि वेळ निघून गेल्यावर मग ती प्रसिद्ध तरी का करावी? ती देखील दुसऱ्या लेखाला आलेल्या प्रतिसादाच्या रुपात? शुभेच्छा देणे आणि ऑलिंपिकच्या यशापयशाबाबत चर्चा हे निश्चित दोन वेगळे विषय होऊ शकतील.
जर पाठवलेला लेखप्रस्ताव लगेच प्रसिद्ध होत असेल तर मग केवळ चर्चाप्रस्तावांची छाननी कशासाठी? प्रकाशकांनी कृपया यामागचे स्पष्टीकरण द्यावे. ज्याला केवळ आक्षेपार्ह लेखन करून खळबळ माजवायची असेल तर तो ते लेखाद्वारेही मांडू शकतो!
नंतर संपादन करण्याची एक सरसकट सूचना नेहमीच दिली जाते, मात्र मला वाटतं चर्चाप्रस्तावासाठी अशी वेगळी सूचना नाहीये. चू. भू. द्या. घ्या.
-सौरभ