हिच गोष्ट ATM च्या बाबतीत लक्षात ठेवावी. इथे नेहमी मराठी चा पर्याय
वापरावा. कारण काही वर्षांनी जर बँकेने पाहणी केली आणि त्यांच्या असे
लक्षात आले की मराठी चा पर्याय जास्त वापरला जात नाही तर ते नवीन
येण्याऱ्या यंत्रातून हा पर्याय काढून टाकतील. जर आपण विचारणा केली तर ते
पाहणी चा डेटा दाखवतील . कोणता पर्याय किती वेळा वापरला हे यंत्रात सहज
साठवले जाऊ शकते.
नेमके बोललात! रोख व्यवहार मराठीतून करावेत. म्हणजे झक मारून मराठी पर्याय पुरविण्याची मागणी पूर्ण करावी लागेल लागतील.
क्रेडिट कार्ड सारख्या सेवेबाबत बहुतेकदा आधी आपल्या आर्थिक व्यवहाराबाबत
-- रक्कम येणे, आली इ. -- माहिती ऐकवतात. त्यात शेकडा दर्शक ''शे'' ऐवजी
सरळ ''शंभर'' हा ध्वनिमुद्रित आकडा वापरतात. (उदा. पाचशे रुपये ऐवजी पाच
शंभर रुपये) हिंदी - इंग्रजीमध्ये संख्या आणि आकडा दोन्ही अर्थाने ''सौ''
''हंड्रेड'' येतात. मराठीचे तसे नाही. हे मी अनेकदा
तिथल्या ''सेवकांच्या'' लक्षात आणून दिले आहे, पण कदाचित माझा आवाज
अत्यल्पमंख्याकी असेल, अजूनही तसेच भयंकर मराठी ऐकू येते. बाकी
'सेवकांचे'' बोल कानी पडलेच तर ते एकेका इंग्रजी वाक्याचे दिव्य भाषांतर
असते असेही जाणवते.
हे अधिकाधिक मराठी भाषकांनी लक्षात आणून द्यायला हवे.
त्यांना याची जाणीव करून दिली तरी ते ''सांगितले गेले"
आहे तसेच बोलतात !
हे 'सेवक' हे सांगकामे असतात. त्यांना सांगून काही फायदा नाही. वरच्या पातळीवर सतत पाठपुरावा करायला हवा. अधिकाधिक मराठी भाषकांनी संबंधितांना सतत निवेदने देऊन सतत 'त्रास' द्यायला हवा. त्यांच्या विरोपपत्रपेट्या (मेलबॉक्स) तुंबवायला हव्यात. ह्यासाठी कुणी पुढाकार घेऊन अशा कंपन्यांचे ईमेल पत्ते दिल्यास अशी निवेदने पाठवता येतील.
भाषा वापरली की टिकते हे आपण जाणताच. तरी ही सूचना मनावर घ्यावी ही विनंती.
अगदी. हेच एखाद्या संकेतस्थळाबाबतही लागू होईल. प्रतिसाद दिले, संवाद घडला तर संकेतस्थळ अधिक जिवंत वाटते. अधिकाधिक सदस्यांनी वाचनमात्र धाटणीतून बाहेर यायला हवे.