चित्त यांचे मुद्दे बऱ्यापैकी पटले.

मुद्दा क्र. १ ते ४ - सहमत

मुद्दा क्र. ५ - मूलभूत गरजा (रोटी, कपडा आणि मकान)

भारतापेक्षा आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या अनेक देशांनी (उदाः इथिओपिया, नायजेरिया, केनिया) आत्तापर्यंत ऑलिंपिक पदकतक्त्यात भारतापेक्षा बरीच सरस कामगिरी केलेली आहे. त्यामुळे सद्यपरिस्थितीतही अजून थोड्या पदकांची अपेक्षा ठेवणे चुकीचे नाही असे वाटते.

मुद्दा क्र. ६ - शरीरयष्टी, आहार

काही विशिष्ट खेळांमध्ये अनेक देशांच्या खेळाडूंना त्यांच्या शरीरयष्टी आणि इतर नैसर्गिक कौशल्यांचा उपयोग होतो हे मान्य. पण भारतात आढळणारी जीवनशैलीतील विविधता लक्षात घेतली तर किमान काही खेळात तरी त्याचा फायदा करून घेता यावा.

मुद्दा क्र. ७ - इतर खेळांबद्दलच्या उदासीनतेमागे ते एक कारण आहेच.

हे सर्व असले तरी आजकाल चित्र बऱ्यापैकी बदलत आहे असे वाटते.