४ थी च्या स्कौलर्शिप च्या मराठी च्या पेपर मध्ये "या शब्दाचा समानार्थी शब्द असलेला पर्याय निवडा" असा एक प्रश्न होता.
शब्द होता "विरंगुळा"
आणि पर्याय होते
१. छंद
२. ....
३. ....
४. गुळापासून तयार केलेला एक पदार्थ.
आणि माझ्या एका बहाद्दर मैत्रिणिने "गुळापासून तयार केलेला एक पदार्थ" असे उत्तर लिहिले होते
---------------------------------------------------------------------------------
याच माझ्या मैत्रिणीचा अजून एक किस्सा...
स्थळः बायोलौजी ची प्रयोगशाळा.
आमचे सर आम्हाला "म्युकर" ची स्लाइड बनवायला आणि निरिक्षणे घ्यायला शिकवत होते.
त्यांनी स्लाइड तयार करून सूक्ष्मदर्शकाखाली ठेवली, आणि एकेकाला बघायला सांगितली.
या मैत्रिणिची पाळी आली. (हिची एक ख्याती होती, की ती बर्याच थापा मारायची, आणि हे सरांच्या कानावर गेलं होतं. )
सरांनी स्लाइड च काढून घेतली. हिला पत्ताच नाही. तिला विचारलं, "काय ---- बाई, दिसतय का?, आणि काय दिसतय? "
हिने जोरात, "हो सर, म्युकर किती छान आणि स्पष्ट दिसतोय" असे उत्तर दिलं