-

-

-

 मी मागच्या एक आठवड्यात एका नीवासी शीबीरात रहायला गेलो होतो. त्यामूळे त्या काळात मनोगतवर मी आलेलो नव्हतो. असो. आता जरा चर्चेकडे वळूया.

१. मराठीतून आज्ञावली लिहीणे म्हणजे काय. 'क्ष' या अक्षराऐवजी 'क्श' असे लिहीले तर आज्ञावली लिहीण्यास कशी मदत होइल.

मराठीतून आज्ञावली म्हणजे काय वीचारता? आज्ञावली म्हणजे प्रोग्रामींग व तेही मराठी भाषेतून.

'आज्ञा' कोण देवू शकतं?......तर जो स्वामी आहे तो. आज्ञेचं पालनं कूणी करायचं?.... गूलामाने... आता गूलाम कोण? ती समोरची व्यक्ती वा संस्थ्या जीच्याशी आपल्याला व्यवहार करायचा आहे व ज्यास व्यवहार करताना जींकायचं आहे. आता जींकायचं असतं म्हणजे काय? बायका खरेदारी करताना भाजीवाल्याशी वा दूकानदाराशी हूज्जत जशी घालतात तशी. अजून माहीती हवी असेल तर ते त्यांच्याकडून समजून घ्या. सध्या अमेरीकेकडे व पाश्च्यात्यांकडे  'व्यवहार करताना कसं जींकायचं असतं ते ज्ञान आहे. म्हणूनच यूनीकोड चा शोध व प्रसार हे त्याचं ओझरतं उदाहरण आहे. इंग्रजांनी सूरवातीला धर्म प्रसारासाठी व आपलं साम्राज्य टीकवण्यासाठी भारतात शीक्शणाचा प्रसार केला होता हे आपण जाणताच.

संगणक हे फक्त माध्यम आहे. हे माध्यम कशाचं? आपले वीचार दूसऱ्या पर्यंत पोहचवीण्याचं. वीचार पोहचवून करायचं काय? आपल्याला जे हवं ते मीळवता यावं यासाठी. मग संगणकाला, ह्या गूलामाला आज्ञावली कशाचं प्रतीक आहे.....तर तर्कशूद्ध वीचार करता येवून समोरच्याला आज्ञा देता येण्याचं. व ते तंतोतंत पालन करवून घेण्याचं.

आता तूम्हीच सांगा, मराठी भाषेतून आज्ञा देण्याचा वीचार करण्यात काही गैर आहे का? व त्यायोगे सामान्य  मराठी भाषींकांचं  व्यवहारकौशल्यावर स्वामीत्व, प्रभूत्व येवू नये का?

२. अक्षरचिन्हे काय भानगड आहे.

आपल्या मराठी लेखनात 'ज्ञ', 'श्री' ही व अशी काही जोडाक्शरचीन्हांना एक वेगळंच महत्त्व दीलं गेलेलं आहे, दीलं जातं. अशा चीन्हां मी 'अक्शरचीन्ह' म्हटलं होत.

(व्यक्तिगत रोख व/वा विषयांतर वाटलेला मजकूर वगळला. : प्रशासक)