सुरेखादेवी, आपण दिलेल्या बहुमानाखातर मनःपूर्वक धन्यवाद!
आपण एवढे दिवस कुठे होतात? अप्रतिम म्हणता तेव्हा वाचत असणार. मग अभिप्राय का नोंदवत नाही?
तसे केल्यास अनुवादकास आवश्यक तो हुरूप मिळू शकतो.
जालकविसंमेलनाच्या संयोजकांना चालत असल्यास आपल्या सूचनेचा अवश्य विचार करता येईल.
सूचनेखातरही मनःपूर्वक धन्यवाद.
मात्र, एरव्हीही कुणा जाणकार संगीतदिग्दर्शकाने नव्याने स्वरबद्ध करून सादर केली तर ती जास्त आस्वाद्य होतील असे मला वाटते. कारण मूळ चाल, मूळ गीतातील शब्दांना न्याय देत असते. अनुवादित गीतास पुरेसा न्याय मिळायचा झाला तर मूळ चालीतही अनुवादातील नव्या शब्दांना पोषक असे बदल करणे जास्त सयुक्तिक ठरेल. अर्थातच, मूळ चालीपासून नवी चाल जेवढी दूर जाईल तेवढी तिची लोकप्रियता कमी होण्याची शक्यता जास्त राहील.