ह्यावरून आठवलं -

माझ्या पहिल्या नोकरीच्या पगाराचा धनादेश २३४८ रु ६८ असा काहीसा मिळत असे. तो वँकेत भरताना मी देवनागरीत भरत असे. अक्षरी रक्कम लिहिताना "तेवीसशे अठ्ठेचाळीस रु. आणि अडुसष्ट पैसे मात्र" असे लिहिणे ते शब्द इंग्रजीत लिहिण्यापेक्षा कितीतरी पटीने सुटसुटीत आणि बिनचूक होत असे.

मात्र हे आमच्या एका सहकारी मराठी भाषिक अधिकाऱ्याच्या नजरेस पडल्यावर त्याने मला अपेक्षाभंग झाल्यासारखे आश्चर्याने विचारले, "हे काय! तुम्ही मराठीत लिहिता? "

मी त्याला म्हणालो, "हो मग! मला मराठी येतं!! "

(वरील अनुभव मी मनोगतावर पूर्वी इतरत्र लिहिलेला आहे.)