उज्ज्वलाजी,
मी तुमचा लेख वाचला होता पण गडबडीत उत्तर देणे जमले नाही. क्ष्मस्व.
त्यात शेकडा दर्शक ''शे'' ऐवजी सरळ ''शंभर'' हा ध्वनिमुद्रित आकडा वापरतात. (उदा. पाचशे रुपये ऐवजी पाच शंभर रुपये)
ह्या कडे आपण काय दृष्टिकोनातून पाहतो त्यावर अवलंबून आहे. अनेक प्रवह भाषेत मिसळून भाषा बनत जाते . बदलत जाते. दर दहा कोसांवर भाषा बदलते म्हणतात. असे अनेक बदल आपण भाषेत होताना पाहतो स्वीकारतो. असे असताना वरील वापर हा एक तंत्रज्ञानाला सोयीस्कर असा नवा बदल आहे ह्या उद्देशाने आपण त्याकडे पाह्यला पाहिजे असे मला वाटते. किंबहुना नव्या न्वया टेक्नॉलॉजीला अडेप्ट करण्यासाठी आपण आपल्या भाषेत तसे बदल आपण होऊन करायला हवे असे मी सांगीन. नपेक्ष आमचीच भाषा ती बरोबर असा हट्ट धरून बसलो तर जागतिक बाजारपेठेत आपण मागे पडू हे आपण ध्यानात घ्यायला हवे असे मी सुचवीन. फ्लेक्सिबिलिटी इज द की टू फ्युचर.