मुद्देसूद चर्चाप्रस्ताव.
खेळ हा मुख्य व्यवसाय म्हणून करणे परवडणारे नाही. खर्च फार, उत्पन्न नाही. त्यामुळे पालकांचे प्रोत्साहन नाही. सरकारच्या बराचसा पैसा (कागदोपत्री) जीवनावश्यक यंत्रणा उभारण्यात जातो. त्यात कपात करून खेळावर खर्च केला तर जनक्षोभ होण्याची शक्यता. शिवाय खेळाडू कोणाची मतबँक नाहीत. त्यामुळे खेळामागे राजकीय इच्छाशक्ती असण्याचे कारणच नाही.
काही करायचेच म्हटले तर माध्यमांनी पुढाकार घेऊन खेळाडूंना सतत लोकांच्या नजरेसमोर ठेवावे. त्यातून प्रायोजक मिळून ऑलिंपिक खेळांचे थोडेफार क्रिकेटीकरण होऊ शकेल. सध्या गाण्याचे, नाचण्याचे जसे आयडॉल होतात तसे एकेका ऑलिंपिक खेळाचे केले तर सहज जमेल.