मीराताई, अभिप्रायाखातर मनःपूर्वक धन्यवाद.

आस्वादासाठी अभ्यासाची गरजच नसते. त्या अनुवादातील गुणांचा शोध घेण्याचीही गरज नसते. आपल्या जाणीवा जसजशा समृद्ध होत जातात तसतसे अनुवादातील गुण आपल्यासमोर आपणहून प्रकट होऊ लागतात. अनुवादात, उपरोल्लेखित गुणांचा आस्वाद मिळण्याची शक्यता माहीत असलेला आस्वादक जास्त बारकाईने, जास्त आनंद मिळवू शकेल. त्याकरता अनुवादाचे सखोल परीक्षण/रसग्रहण करण्याची आवश्यकताच नाही. पहिल्या वाचनातच त्याला आस्वाद्य असणाऱ्या सर्व गुणांचा तो ग्राहक होत असतो.