संस्कृत आणि मराठीतही असे अनेक शब्द आहेत की ज्याचे अर्थ उलटसुलट होतात..

परोक्ष=अपरोक्ष= (एखाद्याच्या) गैरहजेरीत.

चपळ= अचपळ=चलाख, वेगवान.

अनुत्तम=सर्वोत्कृष्ट.

महाब्राह्मण=मूर्ख ब्राह्मण.

महापथ=(महामार्ग-हाय्‌ वे नाही तर..)मृत्यूची वाट.

महायात्रा=अंत्ययात्रा.

सांडशी=जिचा वापर केल्याने पातेल्यातील पदार्थ सांडत नाही ती.

जाते=ज्याच्यातून पीठ येते ते.

संभावित=सज्जन आणि वरून चांगला पण आतून फसव्या.

संभावना=सत्कार आणि खरडपट्टी.

मानभावी=साधू आणि ढोंगी.

महाभाग=सज्जन आणि तऱ्हेवाईक माणूस.

दीडशहाणा/अतिशहाणा=मूर्ख.