या दर्जेदार लेखाबद्दल मंजिरीताईंचे अभिनंदन आणि लेख इथे उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले आभार.

कायद्याच्या बाजूने मांडलेले सर्व मुद्दे पटले. कायदा होण्याच्या दृष्टीने अडचणीचा एक मुद्दा मांडावासा वाटतो तो असा की, इच्छामरणाचा निर्णय घेणारी व्यक्ती हा निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे हे ठरवायचे कसे. गंभीर आजारपणात एखाद्या व्यक्तीला इच्छामरणाची गरज तीव्रतेने वाटू शकते. पण बरे झाल्यावर असा निर्णय घेणे चुकीचे ठरले असते हे ती व्यक्ती मान्य करेल. (ती व्यक्ती बरी होणार की नाही हे शंभर टक्के खात्रीपूर्वक सांगण्याइतके वैद्यकशास्त्रही प्रगत नाही). मानसिक आजार, नैराश्य इत्यादी कारणामुळेही व्यक्तीला मरण हवेसे वाटू शकते. हे सर्व आत्महत्या सदरात मोडणारे असले तरी, इच्छामरण आणि आत्महत्या यांच्यातली सीमारेषा ठरवणे कठीण होईल असे वाटते. असा कायदा झाला तरी त्याचा दुरूपयोग होऊ नये याची काळजी घेणे हे फार मोठे आव्हान असेल.