क्रांतिकारकांची धडाडी आणि हौतात्म्य हे प्रेरणेचे कायमचे स्रोत आहेत. लेख वाचताना पहिल्या ओळीपासूनच अंगावर रोमांच उभे राहिले आणि शेवटी डोळ्यात आलेले पाणी पुसायचेही भान राहिले नाही.
क्रांतिकारकांच्या स्मृतीला माझे वंदन.
साक्षीराव, तुम्ही ही माहिती कुठून शोधून काढता माहीत नाही पण तुमचा हा उपक्रम अगदी बिनतोड आहे यात शंकाच नाही. शाळेच्या पुस्तकांपर्यंत पोचू न शकलेला हा धगधगता आणि रोमांचक असा खरा इतिहास तुमच्यामुळे आमच्यापर्यंत पोचतो आहे. तुम्हाला धन्यवाद!
--अदिती