रावसाहेब,
तुम्ही कणेकरांचा 'माझी फिल्लमबाजी'चा वारसा नवचित्रपटांच्या जोडीने चालू करा बुवा! फटकेबाजी लई आवडली. चित्रपट अद्याप पाहिलेला नाही (आणि एकंदरच नायक-नायिका, कथा-पटकथा इ. बाबत मिळवलेल्या माहितीवरून तो पाहावासाही वाटत नव्हता) आणि पाहीनसेही वाटत नाही.
'कभी कभी अदिती' आणि 'पप्पू कांट डॅन्स साला' ही गाणी व्यक्तिशः मला आवडली. कदाचित नव्या पिढीचा वगैरे 'पर्स्पेक्टिव्ह' असल्याने असेल किंवा अभिरुचीतील फरक म्हणू हवे तर. ती विशेष आवडण्याचे कारण म्हणजे रहमानच्या संगीतातील जाणवलेले वेगळेपण. असो.
लेख/परीक्षण काय म्हणाल ते - आवडले, हे पुन्हा सांगायला नकोच.