सिनेमा पाहिला हल्लीच ज्यात हिरो आणि हिरॉइन एकमेकांचे मित्र आहेत पण गफ्रे/बॉफ्रे च्या घोळात एकमेकांकडे त्या नजरेने पाहायचे विसरून जातात. (नाव आठवत नाही. आयेशा टाकिया, एक मला न आवडणारा नट(नाव आठवत नाही) आणि रितेश देशमुख). "मेरे बाप पेहेले आप" (चित्रपट मला आवडला) मध्येही फारशी अभिनयाच्या भानगडीत न पडणारी आणि पढीक हिंदी बोलणारी, पण टकाटक दिसणारी हिरॉइन हिरोच्या बापाला आजच्या पिढीचे तत्त्वज्ञान सांगताना असेच काहीसे म्हणते. "आज कल हममेसे कोइ ऐसा सोचताही नहीं.... हम दोनो अच्छे दोस्त है... मैंने ऐसा सोचाही नही". ह्म्म्म. बॉलीवुडमध्ये मैत्रीत प्रेमाची हवा न लागण्याची ही फॅशन आलेली दिसतेय.
आणि परीक्षण वाचून हे जाणवले की बरेच चित्रपट बघायचे राहिलेत. रामप्रसादची आठवण करून दिलीत. पुन्हा बघायला हवा एकदा.
नायिकेला ती प्रेमळ स्वरात म्हणते, "फोनपर, बेटा. फोनपर" - छान
परीक्षण आवडले.
-प्रभावित