"त्या काळी घागर बुडताना "बुडबुड" आवाज येण्याइतकं तरी पाणी इथं असावं..."
या शेवटच्या ओळीने अंतर्मुख केले. तिथली सगळी हतबलता आणि नैराश्य या वाक्यातून समोर आले. माझ्या दैनंदीन व्यवहारांमध्ये पाणी, वीज, इंधन या गोष्टींचा अतिरेकी वापर होतोय असे मला नेहेमी वाटते आणि फार अपराधी ही वाटते. पण या गोष्टी इतक्या अंगवळणी पडल्या आहेत की गरज आणि राहाणीमान यांची कारणे देउन त्या भावनेची तीव्रता कमी करण्याचीही सवय लागली आहे. क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे हेही जाणवते आणि आपल्या प्रयत्नांचे कौतुक वाटते.
"या तालुक्याच्या जमिनीवर ही कालव्याची रांग तर जमिनीखाली पाईपलाईनची. दोन्ही कोरडेच. "
माहिती आणि तंत्रज्ञानाचा अभाव की निव्वळ स्वार्थी राजकारण अस प्रश्न पडला.
-प्रभावित