१) क्षमा करा, पण तारेमुळे व इजेक्ट बटनच्या कसरतीने सीडी ड्राइव्ह निकामी होऊ शकतो. पुनर्वापर करण्याची अशी रीत वस्तुच्या टिकाऊपणा व उपयुक्तपणावरच घाला घालते. पर्यावरणाचं संरक्षण कसं होईल जर ही निकामी वस्तू टाकून देऊन नवी घेतली तर?

२) तसंच दूघ साठवण्याच्या शीतयंत्रातील पाण्यात माती घालायची म्हणजे पाणी दुषित करणे... मातीतून अगणित जंतू पाण्यात सोडायचे वर त्यात दुधाचे कॅन ठेवायचे. पाण्याच्या संपर्काने मातीतून जंतुंची अनिर्बंध वाढ होईल त्याचे काय? ते जंतू कॅनच्या बाहेरील आवरणावरून दुधात जाणार नाहीत याची काय गॅरंटी आहे... शिवाय कॅनमधील दूध बाहेर काढताना कॅनवरच्या पाण्याचे जंतुमिश्रित थेंब दुधात मिसळण्याचा देखिल संभव आहे. आरोग्याशी संबंध आहे तिथे स्वच्छता अतिशय काटेकोरपणे सांभाळली गेली पाहिजे.

अशा युक्त्या पर्यावरणाचे संरक्षणच काय पण पैशाची बचत करू शकतील असं मलातरी वाटत नाही... चूक भूल द्यावी घ्यावी!