मृदुलात यांचा लेख वाचला. भारतीय आहार शास्त्र हे खरोखरच उत्तम शास्त्र आहे. आजकाल नवीन पिढी उगाचच डाएट च्या मागे लागून आपल्या आहार शास्त्राला कमी लेखत आहे आणि निव्वळ अंधानुकरण करून उगाचच आपलं हसं करून घेत आहे.
केवळ राहणीमानात झालेल्या बदलामुळे आजकाल नको ते रोग आपल्या मागे लागत आहेत. पूर्वीची राहणी खरोखरच चांगली होती. तेला-तुपाचे खाऊनही योग्य अशा शारीरिक कष्टांमुळे एवढ्या व्याधी परिचीत नव्हत्या/होत नव्हत्या. आजही आपण तेला-तुपाचे पदार्थ खाऊन योग्य त्या प्रमाणात व्यायाम करून स्वतःला फिट ठेवू शकतो. काय वाटते?