कार्यक्रम अतिशय नेटका आणि चांगला झाला. धन्यवाद.
म्हणूनच!
डॉ. कल्याणी दिवेकरांनी 'महाराष्ट्र आणि मराठी भाषा' ह्या पुस्तकाचा घेतलेला आढावा किंचित लांबल्यासारखा वाटला तरी रंजक होता. साध्या सोप्या मराठी भाषेत जड विवेचन टाळत दंतमूलव्य म्हणजे काय ह्यासारख्या गोष्टी जोगळेकर सरांनी ह्या पुस्तकात स्पष्ट केल्या आहेत. डॉ. गं. ना. जोगळेकरांना आत्मस्तुती आणि परनिंदा आवडत नसे, हे त्यांनी नमूद केलेले इथे विशेषत्वाने नमूद करावेसे वाटते. केळकरांचा त्यांनी सांगितलेला एक किस्सा फार आवडला. त्यांना कोणीतरी विचारले, तुम्ही एवढे मोठे आंतरराष्ट्रीय भाषातज्ज्ञ आणि मराठीचा आग्रह धरता. का?" त्यांनी एका शब्दात उत्तर दिले "म्हणूनच!"
(जसे आठवले तसे सांगितले आहे. मोठ्या प्रमाणात चूभूदेघे.)