दिवाळीमनोगत ह्या खात्याचे अधिकार केवळ दिवाळी अंकाच्या प्रशासकांना आहेत. अंकसमितीच्या सदस्यांना नाहीत. त्यामुळे जर ह्या खात्याला आपण व्य.नि.तून लिखाण पाठवले तर ते अंकसमितीच्या सदस्यांना मिळणार नाही.
त्याकरता दिवाळी अंकाच्या प्रशासकांनी जीमेलवर दुवा क्र. १ असे एक खाते उघडले आहे. तरी आपण आपले लिखाण ह्या जीमेलवरील खात्यासच विरोपाने पाठवावे. लिखाण शक्यतो टेक्स्ट फायलीच्या स्वरूपात (किंवा थेट गूगल विरोपाने) पाठवावे. टेक्स्ट फाइल तयार करण्यासाठी मनोगतावरच कोणत्याही लेखन विभागात लिखाण करून ते तिथून उचलून नोटपॅडमध्ये चिकटवावे. (मनोगताव्यतिरिक्त इतरही काही संकेतस्थळे Unicode लिप्यंतराची सुविधा पुरवतात. किंवा गमभन हे एक अत्यंत उपयुक्त साधन आहे. वाटल्यास तेदेखील पाहावे. आतातर गूगलबाबानेदेखील लिप्यंतराची सोय करून दिली आहे. त्यासाठी येथे टिचकी मारा.) फाइल सेव करताना Encodingसाठी Unicode हा पर्याय निवडण्याचे विसरू नये. (ANSI हा पर्याय निवडू नये) अन्यथा आपले लिखाण वाया जाण्याची शक्यता आहे.
कळावे,
- चैत रे चैत.