१००% सहमत. (...पण मलाच उशिर झालाय ).
सामान्य वाचक पद्यानुवाद आणखीही होत राहावेत ह्याबाबत आग्रही नसतो. ज्यांना ते आवडत नाहीत ते मात्र पद्यानुवाद होणे थांबेल कसे ह्याबाबत अत्यंत आग्रही दिसून येतात. असे का व्हावे? पद्यानुवाद लोकांना नको असतात का?
नाही बुवा एक वाचक म्हणून असे मला तरी वाटत नाही. बरेचदा अनुवादासाठी निवडलेली गाणी ओळखीची नसल्याने कदाचीत अनुवाद ओळखता येत नसावा म्हणुनच उत्तरा दाखल प्रतिसाद मिळत नसावा. आता प्रत्येकाच्या आवडी-निवडी वेगवेगळ्या आहेत. गद्य-पद्य, कुट, चर्चा यात कुणाला कितपत रस आहे त्यानुसार त्याचा आस्वाद कसा घ्यावा हे वाचक आपल्यापरीने ठरवतो. आम्हाला मात्र अनुवादात देखिल तितकाच आंनद मिळतो. मंद आवाजात शिट्टीवर गाणे गुणगुणण्यात काय मजा आहे काय सांगु. नेमके तसेच ह्या पद्य अनुवादाचे आहे. ही अनुवादीत कडवी मुळ गाण्याच्या चालीत कधी कुणासमोर गुणगुणल्या आहात का? .......त्याच्या चेहऱ्यावरच तुम्हाला दाद मिळेल.
आपल्या ह्या उपक्रमानेच तर नवोदीताना स्फूर्ती मिळते आणि हातच्या कंकणाला आरसा कशाला? ... अनुवादकांची यादी वाढत चालली आहे. हे ही नसे थोडके.