ठीठ्टण्यानमीमीपर्यावरण संरक्षणाचे म्हणाल तर भारत ई-कचरा (अयोग्य प्रकारे) विल्हेवाटीचे दुवा क्र. १ जागतिक केंद्र बनला आहे असे माझे नव्हे पर्यावरण तज्ज्ञांचे मत दुवा क्र. २ आहे. बारक्या सारक्या सोप्या दुरुस्त्या न करता वस्तू फेकून देणे केवळ चैनीची गोष्ट आहे असे मी मानते.
दुवा क्र. १
E-waste heads to India, China and Bangladesh because computer "recycling" is a good business, with much money to be made.
Computer recycling involves employing people to strip down the computers and extract parts that can be used again in machines to be sold on the high street.
भारतात हा ई-कचरा आपले बारक्या सारक्या दुरुस्ती करणारे भारतीय बंधूच येऊ देतात स्वतःचा फायदा करून घेण्यासाठीच! निष्पाप लोक या पर्यावरणाच्या दुष्परिणामाला बळी पडतात. हे एक दुष्टचक्र आहे...
तुमचा सीडी ड्राइव्ह तुम्ही ५ वर्षे वापरत आहात, तुम्हाला सुदैवी मानलं पाहिजे. माझा सीडी ड्राइव्ह निकामी झाला होता कारण इजेक्ट बटन मोडलं होतं! अनुभव होता म्हणून लिहिलं इतकंच!
आपला हा जर निकष खरा मानायचा तर भारतात प्रत्येक दुधाचा थेंब पिण्यापूर्वी ते दुध ज्या शेतकऱ्याने काढले होते त्याने दुध काढण्यापूर्वी हात धुतले होते की नाही ह्याचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक ठरेल. कारण खुद्द अमूल, गोकुळ आणि महानंदा सारख्या सहकारी दुग्धशाळा आजही हाताने दुध दोहणाऱ्या शेतकऱ्यांकडून दुध घेतात. अजूनही गाईच्या आचळाला यंत्रे लावून दुध दोहन करण्याची पद्धत भारतात आलेली नाही. दुसरे म्हणजे ह्या दुधाच्या कॅनचे तोंड शीतयंत्रात पाण्याच्या पातळीच्या वर कमीत कमी दीड वीत असते तसेच ते दुध पाश्चराईज्ड करूनच लोकांपर्यंत पोहोचवले जाते. निर्जंतुकीकरणाच्या बाबतीत बोलायचे झाले तर भारतात मोठ्या संयंत्रांत बनविल्या जाणाऱ्या बाटलीबंद पाण्याची हमी पण कोणी देऊ शकत नाही ही वस्तुस्थिती लक्षात घ्यावी लागेल आणि मंडईत मिळणाऱ्या भाज्यांबद्दल तर बोलायलाच नको.
भारतात काय पण जगात कुठेही निर्जंतुकीकरणाबद्दल हमी कुणीच देऊ शकत नाही. मातीमिश्रित पाणी दुध साठवण्यासारख्या जागी वापरलं जातं तिथे त्याचे काय परिणाम होऊ शकतील एव्हढंच सांगण्याचा प्रयत्न केला. त्या शेतकऱ्यांना हे समजाऊन सांगता येणार नाही का? आरोग्याचा पश्र जिथे येतो तेथे सुधारणा करण्याचा प्रयत्न आपल्यासारख्यानी करायला हवा तर तुम्ही मला विचारताहात की
असे असेल तर भारतात आपण अन्न पाण्याचा त्याग करणार का?
ती पाळी येणार नाही, कारण पाश्चराईज्ड दूधदेखिल आपण (माझ्यासारखे सामान्य मध्यमवर्गीय) उकळूनच वापरात आणतो. तसंच पाणीदेखिल! बाटल्यातील पाणी मी पीतच नाही. मंडईतल्या भाज्या धुतल्याशिवाय वापरात आणत नाही व शिजल्यावर त्या खायला ठीक असतात असं मी समजते.