१) तुम्ही सांगितलेला प्रयोग हा देसी (म्हणजे जो आपण शोध लावला असे म्हणतो तेच ना? ) नक्कीच नाही. ते दिव्याजवळचे छिद्र त्या उत्पादकानेच दिलेले असते. त्यांच्या माहिती पुस्तकात त्यांनी ह्याची माहिती दिलेली असते. तो प्रयोग मुख्यत्वे वीज नसेल व आपणाला त्या सीडी ड्राईव्ह मधून सीडी काढावयाची असताना टाचणी किंवा तार वापरून करू शकतो. इतर वेळीही होऊ शकतो.
आणि ह्यात सीडी ड्राईव्ह ला नुकसान होण्याचे कारण नाही. कारण उत्पादकानेच ती वेगळी सोय दिलेली असते. पण आजकालच्या नवीन ड्राईव्ह मध्ये बहुधा ते दिसत नाही.