ह्या विषयावरील दोन्ही बाजूंची माहिती देणारा लेख लिहील्याबद्दल धन्यवाद.

नव्वदीच्या विघटनानंतर रशिया दुर्बळ झाला होता. त्याचा फायदा घेऊन पूर्वाश्रमीच्या सोवियत राज्यातून विभक्त झालेल्या राज्यांना फूस लावून हाताला धरावे असा हिशेब ई. यू. व मुख्यत्वे अमेरिकेने केला. जॉर्जियाला नॅटोचे सभासदत्व देण्याचा घाट चाललेला होता, व अमेरिकेने तेथे सैनिकी प्रशिक्षण देणे सुरू केले होते. ऑसेतियाच्या बाबतीत जॉर्जियानेच पहिली कागळीक केली, व तिही नेमकी पुतीन रशियात नसतांना (ते बैजिंग ऑलिंपिक्सला गेलेले होते). हे त्यांच्या व अमेरिकेच्या अंगाशी आले. गेल्या ७-८ वर्षात रशिया तेलाच्या साठ्यांच्या जोरावर आर्थिक दृष्ट्या मजबूत होत आहे, युरोपाचा सर्वाधिक तेलपुरवठा रशिया करते. तेव्हा आता नव्वदीसारखे दुबळे रहायची त्यांना जरूर राहिली नाही. आणि आपण तसे राहणार नाही हेही पुतीन ह्यांनी ह्या घडामोडींतून दर्शवून दिले आहे. हा फटका प्रत्यक्ष जॉर्जियाला दिलेला असला तरी अप्रत्यक्षरित्या तो अमेरिकेला बसलेला आहे, त्याचबरोबर युक्रेनसारख्या जवळपासच्या देशांनाही ह्यातून रोखठोक समज दिली गेली आहे. आता बुश व राईसबाई आदळाआपट करण्यापलिकडे फारसे काही करू शकत नाहीत. अमेरिकेच्या सर्वंकष महासत्तेच्या स्वप्नाला (अजून एक) जोरदार धक्का बसलेला आहे. आता तेथील काही पुढारी ह्या झालेल्या घटनांचा फायदा घेऊन शीतयुद्धाच्या तयारीला लागतील. पण कालचक्र फिरलेले आहे. पुतीन नामे एका खंबीर नेतृत्वाचा उदय झालेला आहे, ह्याची जितक्या लवकर त्यांना जाण येईल तितके बरे.