शनिवार १६ ऑगस्ट २००८
बाकी काल रशियन मिडीयाला चांगलच कोलित सापडल. फॉक्स न्युज वर एका पत्रकाराने दोन दक्षिण आसेतियन स्त्रीयांना बोलावले व त्यांना विचारले की तुम्हाला काय सांगायचे आहे. त्यांनी सांगायला सुरुवात केली 'जॉर्जियन रणगाड्यांनी आमच्यावर हल्ला करायला सुरुवात केली. त्यात रशियन सैन्याचा हात नव्हता. आम्ही रशियन सैन्याचे आभार मानतो की त्यांनी आमच्याविरुद्ध होणारे जिनोसाईड थांबवले. ' असा एकदमच अनपेक्षित सुर आल्याने मुलाखतकार घाबरलाच. त्यानी लगेच ब्रेक घेतला. मग ब्रेकनंतर त्यानी सांगितल की 'काही तांत्रिक कारणांमुळे आम्ही हा कार्यक्रम पुढे चालू ठेवू शकत नाही. 'त्यानी दुसऱ्या महीलेला म्हटले की तुम्ही ३० सेकंदात तुमचे मत नोंदवा. ती म्हणाली 'मला माहीती आहे की तुम्हाला हे ऐकायच नाहीये पण माझ्या घरावर आधी जॉर्जियन रणगाड्यांनी हल्ला केला. माझा मुलगा त्यात मरण पावला. जॉर्जियन सैन्याने आधी केलेल्या हल्ल्याने २००० आसेतियन्स मरण पावले आहेत. याला साकश्विली व जॉर्जियन सरकार जबाबदार आहे'. लगेच मुलाखतकाराने कार्यक्रम थांबवला. हे जरी त्यांनी टि. व्ही. वर दाखवल नाही तरी हा व्हिडीओ इंटरनेटवर लीक झाला. त्यामुळे काल दिवसभर रशियन न्युज चॅनेल्स दाखवत होते की कशा प्रकारे अमेरीकन मिडीयाचा अमेरीकेला पाठींबा आहे वगैरे.
नेमस्तक वरील माहीती माझ्या लेखाच्या शेवटी टाकाल का??इथे माझे लेख संपादित करण्याची सोय आहे का??