प्राजक्त,
हे ही चांगले सँडविच असणार. पण पुन्हा, मी वरूण यांना दिलेल्या प्रतिसादा प्रमाणे, आवडीनुसार बदल करावयास कांहीच हरकत नाही. पण ते 'कांद्याचे सँडविच' राहात नाही. कांद्याच्या सँडविचात (काय शब्द आहे..) कच्या कांद्याच्या स्वादाला मारणारा दुसरा स्वाद नसावा. बटर आणि मेयॉनिझ हे मृदू आणि कांद्याला पूरक स्वाद आहेत. चिझचा स्वाद स्वतंत्र आहे त्याला पूरक टोमॅटो आणि किंचीत काळीमीरी पावडर आहे. पण पुन्हा आवड, चव या व्यक्तीसापेक्ष गोष्टी आहेत. त्यामुळे आपणांस साहित्य निवडायची मुभा आहे.