इतकी वर्षे माणसे पाहिल्यावर माणसांना लेबले चिकटवणे निरर्थक वाटते. माणसे त्याहून गुंतागुंतीची आहेत आणि ती बहुधा आपल्याला अंशःतच कळतात. आपल्याला न भेटलेले त्यांचे एक आयुष्य असते आणि म्हणून त्यांच्याविषयी निष्कर्ष शक्यतो काढू नयेत. काढलेच तर ते आपल्यापुरते समजावेत.
-विजय तेंडुलकर.
या वाक्यासाठी जी. एं शिवाय चांगलं उदाहरण दुसरं कुठं सापडेल? दळवींचं 'परममित्र' वाचून बरेच दिवस झाले. लेखामुळे त्याची पुन्हा एकदा आठवण झाली. जीएंचे पुलंबद्दलचे मत इच्छा नसली तरी पटते. लेख नेहमीप्रमाणे उत्तम.
-सौरभ
धारपांचे कालच निधन झाले. ती एवढी छोटीशी बातमी बघून खूप वाईट वाटले. सन्जोपराव, धारपांवर पुन्हा एकदा लेख लिहलात तर खूप बरे होईल. मी वाट बघतो आहे.