पोह्याची पाककृती आवडली व या पद्धतीने करून पाहिले. मस्त झाले होते. पण तुम्ही चित्रात दाखवल्याप्रमाणे पिवळा रंग आला नाही. हळद किती टाकावी? घाबरत घाबरत भरपूर टाकली पण तरीही रंग आला नाही. उलट 'अर्धा चमचा लाल तिखट' टाकल्याने लालसर छटा आली.
अवांतरः पोह्यांवर लिंबू पिळले की मस्त लागतात. हलवताना शक्यतो झारी वापरावी. म्हणजे झारीवर लिंबू पिळले की बिया काढून टाकता येतात व कडवटपणा येत नाही.