प्रतिसादांबद्दल आभारी आहे.
जी. एं. च्या हयातीतच त्यांच्या लेखनावर पी. एच. डी. चे काम (औरंगाबाद विद्यापीठात? ) सुरू झाले होते. जी.एं. नि त्याला परवानगी नाकारली नाही, पण त्याबाबत काही विशेष उत्साहही दाखवला नाही. मुळात अशा कामासाठी मूळ लेखकाची परवानगी आवश्यक असते तरी का हा प्रश्नच आहे. ( जी. एं वर पी. एच. डी. करणे ही कल्पना कितीही आकर्षक असली तरी माझ्या कुवतीबाहेरची आहे. जी. ए. थोडेफार समजून घेता आले तरी फार झाले!)
जी. ए. या माणसाविषयी माझ्या मनात एक लेखक आणि त्यापलीकडचा माणूस म्हणून प्रचंड कुतूहल आहे. हे सगळे लिखाण त्या कुतूहलापोटीच. अर्थात यातले बरेचसे लिखाण हे 'कंपायलेशन' या स्वरुपाचे आहे. माझे स्वतःचे असे त्यात फार थोडे आहे. जी. एं च्या हयातीत असले काही लिहिण्याचे धाडस मला करवले नसते. जी. एं. च्या पश्चातही हे करणे कितपत योग्य ही शंका मी पहिल्या भागातच बोलून दाखवली होती. असो.
माणसांच्या गुंतागुंतीच्या स्वरुपाबद्दल तेंडुलकरांचे सौरभ यांनी लिहिलेले वाक्य पटले.