महेशराव,
या कवितेला गझल म्हणायचे की नाही, याबाबत चित्त यांनी अभिप्राय दिलाच आहे. त्यांच्या मताशी मी अगदी सहमत आहे.
खरं तर लिहिताना कविता म्हणूनच ही रचना लिहिली गेली... पण पूर्ण झाल्यावर, तुम्ही म्हणता तशी, ती गझलही झाली :). कारण गझलरचनेसाठी जे नियम आवश्यक असतात, ते इथे आपोआपच पाळले-सांभाळले गेले. कविता (मुक्तछंद, छंदोबद्ध, मुक्तक, अष्टाक्षरी वगैरे वगैरे) ही गझल होऊ शकत नाही; पण गझलेत कवितापण नक्कीच असायला हवे.
तुमच्या चिकित्सक प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.