आजानुकर्ण, पोहे केले त्यामुळे खूप छान वाटले. आभार!

पण तुम्ही चित्रात दाखवल्याप्रमाणे पिवळा रंग आला नाही. हळद किती टाकावी? घाबरत घाबरत भरपूर टाकली पण तरीही रंग आला नाही. उलट 'अर्धा चमचा लाल तिखट' टाकल्याने लालसर छटा आली.

माझ्या अंदाजाप्रमाणे तुमची फोडणी कच्ची राहिली असावी त्यामुळे रंग आला नाही.  फोडणीसाठी तेल पुरेसे तापले पाहिजे. तेल तापले आहे का नाही हे बघण्यासाठी त्यात मोहरीचे २-४ दाणे टाकून पाहावे, ते तडतडले की तेल तापले असे समजावे व नंतर बाकीचे फोडणीचे साहित्य घालावे. किंवा तेल खूप तापल्यावर जरी फोडणी केली तरी ती जळते आणि रंग येत नाही. त्यामुळे प्रत्येक पदार्थासाठी फोडणी चांगली झाली पाहिजे म्हणजे रंग चांगला येतो. चवीला चांगले होणे हे मुख्य मग रंग कसा का येईना   भिजवलेल्या पोह्यात हळद, हिंग, लाल तिखट, मीठ, साखर व लिंबू पिळले व मग फोडणीला घातले तरी चालतात. एक वेगळीच चव येते.

चित्त, प्रतिसादाबद्दल आभार.

रोहिणी