१) दुध हे नाशिवंत खरेच. पूर्वीच्या काळी, दुधाच्या भांड्याच्या जवळपास सुद्धा पन्हे, लिंबुरस, कापलेले लिंबू इ. ठेवत नसत जेणे करून दुध फाटण्याचा संभव. दुधाची पदोपदी
अतोनात काळजी घ्यावी लागते.
२) हा हा हा. हमी (गॅरंटी) हा शब्दच माझ्या संगणकाला लागू होत नाही.
त्याचे झाले काय की मी आणि माझ्या भावाने कुठलीही इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू
(उदा. मोबाईल, टीव्ही) घेतली की पुढच्याच महिन्यात त्याच्या किमती कमी होत होत्या. मी आणि माझा भाऊ पार वैतागून गेलो.
मग आम्ही संगणक घेताना एक युक्ती केली. भडकमकर मार्ग (लॅमिग्टन रोड) इथून
वेगवेगळे संगणकाचे पूर्व-उपयोजित (सेकंड हँड) सुटे भाग विकत घेतले आणि संगणक
अभियंत्याला पैसे देऊन त्याची जुळणी (असेंब्लिंग) करून घेतली.
आज ८ वर्षांनतर सुद्धा पी-३ इतका वेग असलेला हा सेलेरॉन मस्त चालू आहे.