नारायण धारपांना माझीही मनःपूर्वक श्रद्धांजली. माझे वडील धारपांचे चाहते होते. मी धारपांच्या कथा एकेकाळी खूप वाचल्या होत्या. त्यामुळे 'धारप' शब्द हा शब्द वाचला की रहस्य, भय, गूढता वगैरे वगैरेंचे हलके शहारे येत असत.  इतके की दुसर्‍या एका धारपांच्या मालकीच्या पुण्यातल्या अल्का टॉकिजात चित्रपट बघायला शिरल्यावर  इथे चार पाच बुजुर्ग समंध नक्कीच वावरत असावेत असे सारखे वाटत राहायचे.