इतकी वर्षे माणसे पाहिल्यावर माणसांना लेबले चिकटवणे निरर्थक वाटते.
माणसे त्याहून गुंतागुंतीची आहेत आणि ती बहुधा आपल्याला अंशःतच कळतात.
आपल्याला न भेटलेले त्यांचे एक आयुष्य असते आणि म्हणून त्यांच्याविषयी
निष्कर्ष शक्यतो काढू नयेत. काढलेच तर ते आपल्यापुरते समजावेत.
-विजय तेंडुलकर.
खरे आहे. अगदी पटले. कुणाचेही आयुष्य आणि त्यातील गुंतागुंत सोपी करून सांगितली तरी ती पूर्ण
चित्र नसते. माणसांना भरपूर 'डिस्काउंट' द्यावा. त्यांचे आयुष्य आपण
जगलेलो नसतो. थेटरात वेगवेगळ्या ठिकाणी बसलेल्या [कधी कधी विंगेत
बसलेल्या आणि आसन बदलू शकणार्या] अनेक प्रेक्षकांपैकी आपण एक. कथानक एकच असले तरी प्रत्येकाला ते
वेगळे दिसू शकते. पण शेवटी आपल्यासाठी ते नाटकच. असो. पुरे झाले माझे पाजळणे.
लेख एकंदर चांगलाच झाला आहे.