व्वा पुलस्ति! गझल छान आहे एकंदर. काही शेर ताकदीचे आहेत. एकंदर गझल आवडली.
भुकेजलेल्या पोरांचा शेर आवडला. मुळात भुकेलेली+कोमेजलेली = भुकेजलेली हा नवा शब्दप्रयोग आवडला :) या शेराच्या दुसर्‍या ओळीत 'किती दुकानातली कधीची शिळी मिठाई तशीच आहे' ऐवजी 'तरी दुकानातली कधीची शिळी मिठाई तशीच आहे' असा मामुली बदल केल्यास ओळ अधिक प्रभावी होईल असे वाटते (भिकार्‍यांची तशी अपेक्षा असली तरी दुसर्‍या ओळीतून मात्र अपेक्षाभंग आणि त्याचे दु:ख)
सावळी निळाई आणि विठाईचे शेरही छान झालेत; मात्र विटेला बिलगणे (?) खटकलेच. त्याऐवजी काही पर्यायी शब्दयोजना करता आल्यास उत्तम होईलसे वाटते.
मतला आणि दुसर्‍या शेराच्या दोन ओळींमधला परस्परसंबंध कमकुवत वाटतो; त्यातल्या त्यात मतल्यात जरा अधिकच! चू. भू. द्या. घ्या.
पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा!