धावपळीत गाडी पकडण्याच्या प्रयत्नांत असाल किंवा एखाद्या महत्त्वाच्या कार्यालयीन चर्चेत.....
शांतपणे कौटुंबीक गप्पा मारत असाल किंवा गाडी हाकत असाल....
अचानक आपल्या भ्रमणध्वनीची घंटी किणकिणते व मग हातातले काम सोडून महाशयांच्या सेवेस हजर व्हावे लागते.
"हॅलो" करताच - " मी 'अमक्या ढमक्या' बँकेकडून बोलत आहे आपणांस वैयक्तिक कर्ज हवे आहे का ? ' किंवा 'मी फलाण्या ढिकण्या विमा कंपनीचा 'एजंट' आहे - आमच्याकडे तुमच्यासाठी नवीन 'स्कीम' आहे.'
ह्या व अश्या प्रकारच्या त्रासांना बऱ्याचदा मी साजूक तुपाहूनही शुद्ध मराठीत एक दोन वेळा उत्तरे देण्याचा प्रयोग केला आहे. हा प्रयोग १००% सफल होतो तर फोन करणारा ठार वेडा !
विषयाला सोडूनः असली फोना फोनी करणाऱ्यांवर जालीम उपायांचा साठा माझ्याकडे आहे, वेळ मिळाल्यास नवा विषय सुरू करून तेथे देईन